महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी नोकरीसोबतच कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी किडनी प्रत्यारोपण चळवळीसह इतर सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या योगदानाबद्दल महावितरणने ‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रमात त्यांचा गौरव केला. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयात हा सत्कार सोहळा झाला. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होते. सहायक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी अनेकांना कायदेशीर मार्गदर्शन केले. त्यांना ‘सर्वोत्कृष्ट विदर्भ महिला २०२५’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तंत्रज्ञ माधुरी वानखडे यांनी ग्राहकसेवेला महत्त्व देण्याचे आवाहन केले. माधुरी वानखडे चांगल्या नाट्य कलावंत म्हणूनही ओळखल्या जातात. जनमित्र मनीषा कांबळे म्हणाल्या, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी वीज क्षेत्रातील आव्हानात्मक कामे यशस्वी करून दाखवली आहेत. वैशाली अग्निहोत्री यांनी सांगितले, महिलांनी ठरवले तर काहीही अशक्य नाही.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%