ग्रामीण रुग्णालय भोकर येथे राज्यस्तरीय NQAS मूल्यांकन संपन्न


आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर NQAS टीमकडून समाधान

भोकर – नांदेड जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर ता.भोकर जि.नांदेड येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया आज दि. ९ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली.  डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ राजाभाऊ गुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पूर्वतयारीबद्दल आणि ग्रामीण रुग्णालय भोकरच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मूल्यांकन समितीने विशेष समाधान व्यक्त केले आहे.

प्रमुख उपस्थितांची उपस्थिती या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय समितीचे प्रतिनिधी म्हणून नॅशनल असेसर डॉ. अश्विनी वाघे मॅडम नागपूर आणि डॉ. प्रियंका साबळे मॅडम कोल्हापूर यांनी उपस्थित राहून ग्रामीण रुग्णालय भोकर येथील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली व मार्गदर्शन केले.

* प्रशासकीय मार्गदर्शनः हे मूल्यांकन यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय पेरके, डॉ राजाभाऊ बुट्टे  यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य केले.

* लक्ष्य २०२६ः शासनाच्या उद्दिष्टानुसार डिसेंबर २०२६ पर्यंत NQAS मानांकित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

* स्थानिक टीम डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे मूल्यांकनावेळी उपस्थित होते.

* समन्वयः जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक (DQAC) डॉ. शामसुंदर लोखंडे, डॉ.व्यंकटेश गुडे, डॉ अर्चना तिवारी मॅडम, डॉ रुबी मॅडम यांनी या संपूर्ण प्रक्रियेत समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.
* भोकर ग्रामीण रुग्णालय येथील माहिती पावर पॉईंट प्रझेन्टेशन (पीपीटि) द्वारे सत्यजीत टिप्रेसवार यांनी माहिती सादर केली.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, स्वच्छता, दप्तर तपासणी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता पाहून समितीने सकारात्मक दाद दिली आहे. या मूल्यांकनामुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येतील. ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज सिस्टर, अधिपरीचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, वर्ग -3, वर्ग -४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन काम केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *