PM Modi Dancing to US Tune? Congress Leader Harsvardhan Sapkals Strong Criticism



अमेरिकेने इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाकडून पुढील 30 तेल खरेदी करण्याची मुभा दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिकेच्या या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारवर टीकेची झो

.

अमेरिकेच्या वित्त विभागाने (ट्रेझरी डिपार्टमेंट) भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे. ही मुदत 4 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेने ही कथित सवलत दिली आहे. पण अमेरिकेची ही सवलत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणी मोदींवर शरसंधान साधत भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण टाकल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनीही मोदींवर तोंडसूख घेतले आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ शनिवारी सकाळी एका पोस्टद्वारे म्हणाले, भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण? हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान, आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणातील फोलपणा नाही का? भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर का नाचताहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी एपस्टिन फाईल मुळे अमेरिकेसमोर कॉम्प्रमाईज्ड होऊन भारत देशाचा अपमान करत आहेत.

शाब्बास… तुम्ही परंपरा जपली

हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व पीएम मोदींचा एक फोटो पोस्ट करत सरकारवर उपरोधिक टीका केली होती. सपकाळ यांनी शेअर केलेल्या फोटोत मोदींच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ अशी पट्टी लावली आहे. त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा एक कागदही दिसत आहे. त्यावर ‘शाब्बास… तुम्ही परंपरा जपली’, असे सावरकर मोदींना म्हणताना छायाचित्रात दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सावरकरांवर छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप

उल्लेखनीय बाब म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला होता. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. ‘स्वराज्य हे स्थापन होणारच होते. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले’, असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असे लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ या प्रकरणी म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *