विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी बाप्पू मानकर बिनविरोध:अध्यक्षपदाची गाडी नाकारून वाचलेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय

0
b1dc3e5e-eedc-4eae-8c80-ccbc27b0803e_1776779585321.jpg




भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत प्रभाग २५, शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पदभार स्वीकारताना त्यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेवक पदाचे मानधन नाकारून तो निधी महापौर वैद्यकीय सहायता निधीमध्ये वर्ग केला होता. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks