नांदेड – होळी या सणानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी प्लास्टिक आणि कचऱ्याची अनोखी होळी साजरी करुन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला. लाकडे, गोवऱ्या यांचा वापर न करता शाळा आणि शाळा परिसरातील कचरा गोळा करून तो पेटवून दिला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेत होळी साजरी केली. यासाठी वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी मदत केली. त्यांनीच तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करुन आज धुलीवंदनाच्या निमित्ताने रासायनिक रंग वापरु नयेत असा संदेश यांद्वारे व सोशल मीडियाद्वारेही दिला आहे.
वर्षभरात शाळेकडून प्रसंगानुरुप तसेच शालेय सहशालेय उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. प्लास्टिक आणि कचऱ्याची होळी साजरी केली करताना सर्वांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पाण्याचा गैरवापर टाळणे तसेच नैसर्गिक रंगाचा वापर करणे, इकोफ्रेंडली होळी साजरी करणे आदी संदेश देण्यात आला. इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्यांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात आला. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांच्या वस्तूचे वेष्टन, रॅपर्स, रिकाम्या पाणी बाॅटल्स, प्लाॅस्टिकचे ग्लास, पाणी पाऊच, कॅरीबॅग, इतर प्लास्टिक वेस्टेजेस अशाप्रकारच्या कचऱ्याला एकत्रित करून जाळून नष्ट करण्यात आले. याकामी मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ आणि मनिषा गच्चे यांनी सहकार्य केले.

Post Views: 10
