रामतीर्थ (प्रतिनिधी) – मौजे थडीसावळी येथे ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या दरम्यान एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव दुर्गेशसिंह दारासिंग ठाकूर (वय २२, रा. मुटलाळ ता. बिलोली) असे आहे. आरोपींनी संगनमत करून दुर्गेसिंह यास शिवीगाळ करत केबल वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गंगासिंग हनुमानसिंग ठाकूर, राजू गंगासिंग ठाकूर, हनुमानसिंग गंगासिंग ठाकूर, पद्मसिंग गंगासिंग ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, विजयासिंग दिलीपसिंग ठाकूर, विशालसिंग दिलीपसिंग ठाकूर आणि प्रतापसिंग दिलीपसिंग ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी रवींद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर (वय ४८, व्यवसाय शेती, रा. घडीसावळी ता. बिलोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३, १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे करीत असून आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 362
