![]()
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर
.
२२ जानेवारी रोजी कार्यकारी समितीने काही निर्णय घेतले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी काही दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात वेतन, बोनस आणि वेतनफरक यांसारखे मूलभूत प्रश्न आजतागायत प्रलंबितच राहिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनाकडून कामगारांशी संवाद साधण्यात सातत्य नसल्याची भावना कर्मचाऱ्यांत वाढत चालली आहे. श्रद्धेच्या आधारावर उभ्या असलेल्या संस्थेत कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
दिवाळी २०२५ चा दीड पगार इतका बोनस अद्याप देण्यात आलेला नाही, तो तात्काळ अदा करावा अशी मागणी आहे. तसेच सहाय्यक कामगार आयुक्तांसमोर झालेल्या समझोत्याप्रमाणे वेतन बदलातील फरक थकित रकमे सहित देण्यात यावा, अशीही ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
या मागण्या केवळ आर्थिक नसून कर्मचाऱ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेशी निगडित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. उपोषणासाठी मंडप उभारण्याच्या प्रयत्नांनाही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मंडपासाठी आलेल्या वाहनाला सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने साहित्य भिंतीवरून आत न्यावे लागल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे संतापाची भावना अधिक तीव्र झाली असून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांतील दरी वाढल्याचे दिसून येते.
मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन कामगार संघटनेने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. श्रद्धास्थानाच्या पवित्र भूमीत उभा राहिलेला हा संघर्ष केवळ वेतनाचा नसून विश्वास, संवाद आणि व्यवस्थापनाच्या उत्तरदायित्वाचा असल्याचे सांगण्यात आले.
