मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या प्रकरणाची एसआयटी किंवा फॉरेन्सिक चौकशी करण्याऐवजी आधी एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘शिंदेंवर कारवाई केली पाहिजे’ ५०० कोटी रुपयांच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले, “आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि ईडी ५-५० लाखांसाठी लोकांना अटक करते. मग जर श्रीकांत शिंदेंना ५०० कोटी रुपये दिले असतील, तर हा थेट हवालाचा व्यवहार आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीने कारवाई केली पाहिजे.” ‘५०० कोटी गेले कुठे?’: “मनोज जरांगे पाटील म्हणतात की त्यांच्याकडे ५०० कोटी आले नाहीत, पण ते दिले गेलेत. मग हे पैसे गेले कुठे? हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शहा आणि ईडी-सीबीआयला पडला पाहिजे. जर त्यांना हा प्रश्न पडत नसेल, तर त्या ५०० कोटींमधले काही खोके इकडे-तिकडे गेलेत का? याची चौकशी झाली पाहिजे,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ‘SIT आणि फॉरेन्सिकची नाटकं बंद करा’: ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक किंवा एसआयटी चौकशी करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मागणीला राऊत यांनी फेटाळून लावले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटीची नाटकं बंद करावीत. एसआयटी ही केवळ धूळफेक असून स्वतःला वाचवण्यासाठी आहे. फॉरेन्सिक लॅब गृहखात्याच्या हातात असते आणि गृहखात्याला जे हवे तेच अहवालात येते. त्यामुळे आधी ५०० कोटींच्या व्यवहाराचा एफआयआर दाखल करा,” अशी मागणी त्यांनी केली. ‘एआय’चा दावा खोटा भाजपकडून ही क्लिप ‘एआय’ (AI) जनरेटेड असल्याचे सांगितले जात आहे, त्यावर राऊत म्हणाले, “ज्या काळात ही क्लिप तयार झाली, तेव्हा एआयचा एवढा जोर नव्हता. फोन टॅप करणारे तुमचेच लोक आहेत. मनोज जरांगे खोटे बोलत आहेत का? हे भाजपने स्पष्ट करावे.” ‘हे बिश्नोईंचे सरकार आहे का?’: ही ऑडिओ क्लिप विरोधकांनीच बाहेर काढल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. यावर उत्तर देताना राऊत संतप्त झाले. “क्लिप कुणीही फोडू द्या. तुम्ही ५०० कोटी दिले की नाही? त्यातील संवाद तुमचे आहेत की नाही? तुमचा जो ‘डुप्लिकेट चाणक्य’ आहे, तो त्यात बोलताना दिसतो की नाही? हे काय बिश्नोईंचे सरकार आहे का? आता जनताच चाणक्य झाली असून डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. ——————- हेही वाचा… जरांगेंना कुणी मोठं केलं आणि आता कुणी खाली खेचतंय?: चंद्रकांत खैरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठीच ऑडिओ क्लिपचं नाटक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. “पाचशे कोटी रुपये कुठे दिले आणि कसे दिले? याचा खुलासा झाला पाहिजे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे पैसे पोहोचवले असे म्हणतात, तर त्यांना पकडून या प्रकरणाची चौकशी करा,” अशी मागणी खैरे यांनी केली आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation संभाजीनगर हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- हा तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा रस्त्यात पाडलेला मुडदा