[ads1]
![]()
ग्वाल्हेरमध्ये शनिवारी मध्यरात्री १:३० वाजता ट्रकने तब्बल ४५ भाविकांना चिरडले. या दुर्घटनेत 13 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. याशिवाय या घटनेत २ पोलिस कर्मचाऱ्यांसह 29 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व भाविक सप्तमीच्या निमित्ताने शीतला माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. हा अपघात चीनौर रोडवरील उताराजवळ झाला. जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांच्या माहितीनुसार, ट्रकने भाविकांना आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना चिरडत मंदिराच्या प्रवेशद्वाराला धडक दिली. धडकेमुळे मंदिराची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने ४०-५० जण ढिगाऱ्याखाली दबले होते.
[ads2]
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%