.

राजकमल रेल्वे उड्डाण पुलाचे घोडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीसाठी अडले आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आरओबी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी शहरवासीयांना काँग्रेसनगर, रुक्मिणीनगरकडे यायचे असल्यास किंवा राजकमल चौक, श्री अंबादेवी मंदिर परिसरासह जुन्या अमरावती शहरात जायचे असल्यास किमान दोन ते तीन कि.मी. अतिरिक्त फेरा घेऊन जावे लागते. त्यामुळे इतर रस्त्यांवरील ताण वाढून शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे.
हा पुल शहराची लाईफलाईन असून, ६ महिने झाले तरी जनप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनासह, पीडब्ल्यूडीच्या उदासीनतेमुळे अद्याप तो पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे साहजिकच उर्वरित. पान ४ ^मध्ये रेल्वेद्वारे राजकमल चौकातील धोकादायक व शिकस्त आरओबी पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीने त्यांचे साहित्य मागील काही दिवसांपासून येथे आणून ठेवले आहे. परंतु, १५ दिवसांआधी भुसावळ कार्यालयाने पत्र पाठवल्यानंतरही पीडब्ल्यूडीने परवानगी दिली नाही. -विनोद राणे, असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर रेल्वे. राजकमल रेल्वे उड्डाण पुलावर कोणीही बळजबरीने वाहन नेऊ नये तसेच पुल खचून कोणातही धोका होऊ नये, म्हणून पुलाच्या दोन्ही बाजुला प्रत्येकी ५ फुटाच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही बाजुला असलेल्या भिंती तोडल्यानंतरच पुल पाडण्याचे काम मार्गी लागणार आहे. तेथे मशीन्स व इतर साहित्य नेता येईल. या दोन्ही भिंती एजन्सीच्या कामात मुख्य अडथळा ठरल्या आहेत. जोवर पीडब्ल्यूडी त्या पाडत नाही. तोवर काम सुरू होणार नाही.
