Varsha Gaikwad Slams PM Modi Over Apology Video


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका व्हिडिओमध्ये ‘आईवरून शिवीगाळ करणाऱ्या मुलांना मी माफ करतो,’ अशी सामंजस्याची भूमिका मांडली होती. यावरून आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार पलटवार केला आहे. “सोनिया गांध

.

सोनिया, इंदिरा गांधींवर बोलताना राग का आला नाही?

पंतप्रधानांच्या माफीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींच्या आईवरून कोणी काही बोलले असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे, कारण प्रत्येक आईचा सन्मान झालाच पाहिजे. पण, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी याही कोणाच्या तरी आई आहेत ना? पंडित जवाहरलाल नेहरू कोणाचे तरी वडील होते. त्यांच्याबद्दल संसदेत आणि सार्वजनिक व्यासपीठावर भाजपकडून जे शब्द वापरले गेले, ते ऐकून मोदींना तेव्हा राग का आला नाही?”

“राहुल गांधींना तुम्ही ‘पप्पू’ म्हणता, गांधी परिवाराबद्दल चुकीचे शब्द वापरता आणि ते सर्व खपवून घेता. पण आता तरुण पिढी तुमच्या धोरणांविरुद्ध मत मांडत आहे, तेव्हा तुम्हाला राग येतो. भाजपमध्ये आणि मोदींमध्ये दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची ताकदच नाही. स्वतःची ‘मन की बात’ सांगण्यापेक्षा लोकांच्या मनातील गोष्टीही ऐकायला शिका.”

अमित शहांना लोहपुरुष म्हणणे म्हणजे पटेलांचा अपमान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरूनही त्यांनी भाजपला घेरले, “पुण्यात अमित शहांना ‘चाणक्य’ आणि ‘लोहपुरुष’ म्हटले जात आहे. ज्या व्यक्तीवर एकेकाळी अनेक केसेस होत्या, त्यांची तुलना तुम्ही थेट सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या खऱ्या लोहपुरुषाशी कशी करू शकता? हा त्यांचा अपमान आहे. संसदेत उत्तर देण्याची ज्यांची हिंमत नाही, त्यांचा उदो उदो करणे थांबवा. अमित शहांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलले आहे, मी या दडपशाहीचा तीव्र निषेध करते.”

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहताना त्यांनी त्यांच्या साहित्यातील विद्रोही स्त्री पात्रांचा आणि योगदानाचा गौरव केला. तसेच, महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने अण्णाभाऊ साठेंना ‘भारतरत्न’ सन्मान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने लावून धरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मनुस्मृतीचे आणि हेडगेवारांचे विचार इथे चालणार नाहीत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या निवासस्थानाबाबत पोस्ट खात्याने काढलेल्या कार्यपुस्तिकेवरून विचारलेल्या प्रश्नावर गायकवाड म्हणाल्या, “सध्याचे सरकार हे हेडगेवार आणि मनुस्मृतीचे विचार मानणारे आहे. पण एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचा आहे. इथे मनुस्मृती किंवा हेडगेवारांचे विचार कधीही रुजणार नाहीत.”

हेही वाचा…

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल:अतिरेक्यांशी बोलता, पण देशाच्या भाग्यविधात्यांना झुरळ म्हणता; ही मुले तुम्हाला माफ करतील का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या आंदोलक तरुणांना माफ केल्याचे एका व्हिडिओद्वारे म्हटले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अतिरेक्यांशी बोलायला तुम्हाला काही वाटत नाही, पण देशाच्या भाग्यविधात्यांना तुम्ही झुरळ आणि भरकटलेले म्हणता,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचबरोबर, आमदार आदित्य ठाकरे यांनीही ‘एक्स’ (ट्विटर) वरून दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईवरून केंद्र सरकारला घेरले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

मुलांना माफ करण्याऐवजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा:पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंची टीका, अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलांना माफ केल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून पंतप्रधानांवर जोरदार पलटवार केला आहे. मुलांना माफ करण्याचे नाटक करण्याऐवजी पंतप्रधान महोदय, आपणच देशातील मुलांची माफी मागायला हवी, अशी थेट मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

मुले मनाने निरागस आणि प्रामाणिक असतात. समाजात जे घडते, त्यातूनच ती शिकतात. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना जेव्हा प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो, असे पटोले म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी

अभिजित दिपकेंचा थेट सवाल:शिवीगाळ करणे हा गुन्हा असेल, तर भाजपच्या आयटी सेल आणि नेत्यांवर कधी कारवाई होणार? तरुणीवरील FIRला विरोध

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीवर नोएडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईला ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शिवीगाळ करणे हा काही गुन्हा नाही; जर तसे असेल तर महिलांना ऑनलाइन घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर आणि नेत्यांवर गुन्हे कधी दाखल होणार?” असा थेट सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *