Hingoli Police Seize Sand Tippers Arrest Drivers Illegal Transport



हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. रविवारी (दि. २२) पोलिसांनी औंढा नागनाथ आणि हिंगोली शहरालगत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये वाळूने भरलेले दोन टिप्पर पकडले. या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे २

.

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीबाबत कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर दररोज कार्यवाही चालू आहे. त्या अनुषंगाने अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या पथकाला औंढा शहरांमध्ये मार्केट कमिटीच्या मोकळ्या जागेत एक अवैधरित्या वाळू भरून टिप्परद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून जमादार संदीप पवार, गजानन राठोड, सुमित टाले, नरवाडे, विनोद कुटे यांच्या पथकाने औंढा नागनाथ येथे छापा टाकून वाळू सह टिप्पर असा पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालक गजानन चव्हाण (रा रुपूरतांडा) याचे विरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याशिवाय अन्य घटनेमध्ये हिंगोली शहरालगत गंगानगर भागामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार सुभाष घुगे, संदीप जाधव, किशोर सावंत यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये पोलिसांनी एका टिप्परसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टिप्पर चालक वैभव सांगळे (रा.माथा ) याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हे ही वाचा…

नवोदय विद्यालयातील प्राचार्यांची बदली रद्द करा:475 विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन; स्वतःला वसतिगृहात घेतले कोंडून

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयात आज भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, या मागणीसाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी आज, रविवार (दि. २२) पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला वसतिगृहाच्या आवारात कोंडून घेतले असून, जोपर्यंत प्राचार्यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत पाणीही पिणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने प्रशासकीय पथक घटनास्थळी पाठवले आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *