नांदेड – नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे, त्या गावातील ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य करण्यात आले होते.
मात्र सदर अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामसेवकांच्या रहिवासी दाखल्याऐवजी अर्जदारांनी स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) अर्जासोबत जोडावे, असे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कळविले आहे. तरी इच्छुक अर्जदारांनी सुधारित सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Views: 153
