Chhatrapati Sambhajinagar Ghalib Mahotsav Inauguration Singer Shubha Joshi PHOTOS | संभाजीनगरमध्ये गालिब महोत्सव: गायिका शुभा जोशी यांच्या हस्ते उद्घाटन, ‘साहित्य संगीत कला मंच’तर्फे आयोजन – Chhatrapati Sambhajinagar News
महान उर्दू कवी गालिब यांच्या २२९ व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये साहित्य संगीत कला मंचच्या वतीने ‘गालिब महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. २७ डिसेंबरपासून हा दोन दिवस हा महोत्सव होईल.
.
महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गझल गायिका शुभा जोशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती साहित्य संगीत कला मंचचे संस्थापक श्रीकांत उमरीकर यांनी दिली. फक्त कार्यक्रम दोन वेगवेगळ्या स्थळी होणार आहे.

गझलांची मैफल
श्रीकांत उमरीकर म्हणाले की, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गालिब गझलांची मैफल सादर होणार असून यात वैभव पांडे (गायन), वर्षा जोशी (गायन), पंकज शिरभाते (व्हायोलीन), कृष्णराज लव्हेकर (संवादिनी), गजानन धुमाळ (तबला) हे कलाकार सहभागी आहेत. उर्दू साहित्याचे अभ्यासक दासू देशपांडे (परभणी) हे गझलांचे निरूपण करणार आहेत.
व्याख्यान अन् कव्वाली
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी ‘गालिब गालिब क्युं थे’ या विषयावर प्रसिद्ध उर्दू शायर व अभ्यासक प्रा. डॉ. सलीम मोहीउद्दीन यांचे व्याख्यान होणार असून त्यानंतर ऐनोद्दीन वारसी आणि संच सुफी कव्वाली सादर करणार आहे. या संचात ऐनोद्दीन वारसी (गायन), शेख ताजोद्दीन (कोरस/हार्मोनियम), प्रकाश सोनकांबळे(तबला), शेख अहेमद(ढोलक), अनहद वारसी(बासरी), वरदा वारसी(कोरस/गिटार), श्रीकांत उमरीकर (बोलवाद्य) हे कलाकार सहभागी आहेत.
कार्यक्रम स्थळ असे
२७ डिसेंबरचा कार्यक्रम महसूल प्रबोधिनी येथे, तर २८ डिसेंबरचा कार्यक्रम जीवन विकास ग्रंथालय टिळक नगर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संगीत कला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
