![]()
इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा, संशोधनाचा ,चेतनेचा, प्रेरणांचा, अभिमानाचा व स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करून पाहण्याचा करून दाखवण्याचा विषय आहे. काही घडवण्याचा करून पाहन्याचा आसंग आहे. इतिहास विसरणारी माणसे
.
ते सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात “शिवचरित्र तरुणांचा जगण्याचा मंत्र’ या विषयावर बोलत होते. यावेळी विचारपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, उद्योजक वैभव नागणे, शिवजयंतीचे माजी अध्यक्ष शरद हेंबाडे, विठ्ठल गायकवाड, चंद्रशेखर कोंडूभैरी, संभाजी घुले, अनिल मुदगुल उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.बानगुडे पाटील म्हणाले की, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आपल्या हयातीत सगळ्यात जास्त स्मारके व पुतळे कुणाची उभारली असतील, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत. महापुरुष गेल्यानंतर त्यांची पुतळे स्मारके उभारणे स्वाभाविक आहे. परंतु जिवंतपणे उभा राहणे अत्यंत दुर्मिळ आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी सांगितले होते महाराष्ट्राला धोका जमिनीवरून नाही तर समुद्रावरून धोका आहे. २६/११ एवढीशी मुंगी ध्येय गाठते ना, आपल्या पोरांना काय अडचण आहे. धाडस असतेच प्रेरणा आणि संस्कार महत्वाचे आहेत. जी माणसं कारणे सांगतात, ती माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. जी माणसे यशस्वी होतात, ती माणसे कधीच कारणे सांगत नाहीत. सगळीकडे तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून बापांच्या खांद्यावर पोरांची प्रेते जात आहेत. कसली पिढी तयार करत आहोत आपण ही पिढी राज्य उभा करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. २६/११ चा हल्ला झाला मग आम्हाला कळालं महाराज सांगत होते ते खरं होतं. पुढे म्हणाले की, तरुणांनी स्वतःच्या कमतरतेला बलस्थाने बनवा, शांत समुद्र उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उत्तम खलाशी तयार होण्यासाठी उधाण आलेल्या दर्यात उडी घेतली पाहिजे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फक्त तिघेजण फिरू शकतात एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. ५० वर्षाच्या आयुष्यात महाराजांची एकही घटना अशी नाही की, त्यामध्ये महाराजांनी नियोजन केले नाही. त्यांच्या आयुष्यातील एकमेव घटना आहे की, ज्याचं नियोजन केलं नाही ते म्हणजे त्यांचा मृत्यू होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी फॅमिली पेन्शनची योजना सुरू केली होती. राज्य राखीव पोलिस दल ही संकल्पना शिवाजी महाराजांचीच होय. या व्याख्यानाच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शिवप्रेमी, महिला, तरुण मुलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सगळीकडे तरुण पिढी व्यसनाधीन झाली
