महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे दर्शन बाहेरून नव्हे, गाभाऱ्यातूनच‎:आधीचा निर्णय मागे; लाखो भाविकांना दिलासा, घृष्णेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने दर्शन



येथील बारावे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त यावर्षीही भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. प्रारंभी वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याबाहेरून दर्शन घेण्याचे आदेश

.

मंगळवारी (दि. ३) वेरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री आढावा बैठक पार पडली होती. यात्रेदरम्यान होणारी प्रचंड गर्दी, सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थापन यांचा विचार करून त्या बैठकीत गाभाऱ्याबाहेरून दर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाविकांनी गाभाऱ्यातूनच, देवाला स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा कायम ठेवावी, अशी ठाम मागणी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक वेरूळ येथे दाखल होतात. बाहेरून दर्शनाची सक्ती केल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी भूमिका मांडण्यात आली. परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वीचा निर्णय बदलत सुधारित आदेश जारी केला असून महाशिवरात्री यात्रेदरम्यान गाभाऱ्यातूनच दर्शन होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. गाभाऱ्यातून दर्शनास परवानगी देताना पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख, रांगा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेचा कालावधी सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन व मंदिर ट्रस्ट समन्वयाने कार्यरत राहणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त वेरूळला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गाभाऱ्यात प्रवेश ही येथील पारंपरिक पद्धत असल्याने निर्णय बदलल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सुरक्षा व नियोजनाला प्राधान्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks