तिवसा तालुक्यात अप्पर वर्धा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, पण वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. यामुळे तिवसा तालुका काँग्रेस कमिटीने महावितरणकडे ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तातडीने अपग्रेड करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर गिरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी शेतकरी फिडरवरील ट्रान्सफॉर्मर तपासणी करून अपग्रेड करण्याची, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची आणि लोडशेडिंग असलेल्या ठिकाणी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा देण्याची मागणी केली. रब्बी हंगामातील मर्यादित पाणी वापरता यावे यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव वानखडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक रवींद्र हांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ट्रान्सफॉर्मर देखभाल-दुरुस्तीसाठी समिती नेमावी आणि अभियंत्यांना तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत, असे सुचवले.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%