कंटेनरवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाली. साक्षी अमोल सावंत (वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी रेणुका बलभीम कांबळे (वय २२) जखमी झाली. तिच्यावर रुग्मालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंटेनर चालक योगेश नागनाथ सातपुते (वय ३५, रा. कौठळी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार साक्षी सावंत आणि तिची मैत्रिण रेणुका कांबळे बाह्यवळण मार्गावरुन निघाल्या होत्या. नवीन कात्रज बोगद्याजवळ थांबलेल्या १८ चाकी कंटेरनवर दुचाकीस्वार साक्षी आदळली. अपघातात दुचाकीस्वार साक्षी आणि तिची मैत्रीण रेणुका गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्तळी भेट दिली. दोघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच साक्षीचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती चौकशीत मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत. स्वारगेट पीएमपी थांब्याजवळ तिकिटांची पिशवी चोरीला स्वारगेट पीएमपी थांबा परिसरात तिकिटांची पिशवी (ट्रे) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. चोरलेल्या तिकिटांची किंमत २६ हजार ७४० रुपये आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपी वाहक प्रल्हाद ढाकणे (वय ४४) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पीएमपी थांबा परिसरात तिकिटांची पिशवी चोरीला गेली. तिकिटांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ढाकणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
कात्रज बोगद्याजवळ कंटेनरला दुचाकीची धडक:तरुणीचा मृत्यू, मैत्रीण गंभीर जखमी; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल