नवीन नांदेड (प्रतिनिधी):ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको परिसरातील तीन ठिकाणी तर वसरणी व वाजेगाव,कांकाडी येथील अशा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बारावीच्या सात परीक्षां केंद्रवर सुरुवात झाली असून याठिकाणी जवळपास पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर 2574परिक्षार्थ्यानी दिला, सिडकोतील शिवाजी विद्यालय येथे नांदेड़ परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ.खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड या वाघाळा येथील पोस्ट बेसिक महात्मा फुले आश्रम शाळेस भेट देऊन केंद्र परिसरातील परिक्षार्थी हॉल पहाणी केली.
लातूर बोर्डाच्या उच्यमाध्यमिक च्या बारावी परीक्षांना दि.10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली सिडको परिसरातील शिवाजी उच्यमाध्यमिक सिडको या ठिकाणी 257 विध्यार्थ्यानी परीक्षा दिली याठिकाणी केंद्र प्रमुख प्रा.एस.एम.देवरे असून पर्यवेक्षक काम पाहात आहेत, तर इंदिरागांधी ज्युनिअर कॉलेज येथे 374 विध्यार्थ्यानी परीक्षा दिली, या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून प्रा. सातानुरे सहाय्यक प्रा.डॉ.रमेश नांदेडकर हे काम पाहात आहेत , कुसुमताई उच्य माध्यमिक विध्यालय येथे 222 विध्यार्थ्यानी परीक्षा दिली या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून प्रा. भागवत हारे तर सहाय्यक म्हणून प्रा. अंगध केंद्रे ,हे कार्यरत आहेत
वसरणी येथील वसंतरावनाईक कनिष्ठ महाविघालय येथे 247 विध्यार्थ्यानी परीक्षा दिली, या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून प्रा.एस. डब्लू.कोतवाल हे काम पाहात ,वाजेगाव येथील राष्ट्रमाता उच्य माध्यमिक विद्यालय येथील केंद्रावर परीक्षेला सुरुवात झाली या ठिकाणी 383 विध्यार्थ्यानी परीक्षा दिली असून या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून प्रा.एस.एम.देशमुख हे काम पाहत असून शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी येथे 470 विद्यार्थी परीक्षा देत असून केंद्र प्रमुख प्रकाश पवार पर्यवेक्षक मुख्याध्यापक जाधव विपिन लक्ष्मणराव काम पाहत आहे तर वाघाळा पोस्ट बेसिक अश्राम शाळा महात्मा फुले महाविद्यालय वाघाळा या परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून भगवान इंगेवाड हे काम पाहत आहेत या ठिकाणी 621असे2574 परिक्षार्थी परिक्षा देत आहेत.
ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचारी व महिला पोलीस, होमगार्ड कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त वातावरणात परीक्षांना सुरुवात झाली यावेळी परिक्षार्थी यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पहिल्या दिवशीच पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी ऊमाप यांनी सिडको येथील शिवाजी महाविद्यालयात या केंद्रावर भेट देऊन परिक्षार्थी हॉल पाहणी व संबंधित केंद्रावरील नियुक्त केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक यांच्याशी सुसंवाद साधला व पोलीस बंदोबस्त आढावा घेतला, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी संवेदनशील असलेल्या वाजेगाव,कांकाडी, वाघाळा या परिक्षा केंद्रावर जाऊन पाहणी करून पोलीस बंदोबस्त आढावा घेतला,तर जिल्हाधिकारी डॉ राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ.खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड यांनी वाघाळा येथील महात्मा फुले अश्राम शाळेस भेट देऊन पाहणी केली.
Post Views: 68
