नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 4 फेबु्रवारी रोजी दुपारी वाजेच्यासुमारास वडगाव शिवारातील बाभुळ वनात जुगार खेळणाऱ्या चार जणांना पकडल्याने त्यांच्याकडून एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार असीफ अली अजगर अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील साळुंके, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, कांबळे आणि जमीर असे सर्व गस्त करत असतांना वडगाव शिवारातून जात होतो. त्यावेळी बाभुळ वनाच्या मोकळ्या जागेत जुगार सुरू होता. पोलीसांनी तेथे छापा टाकून अवधुत चंपतराव पुयड (40) रा.पुणेगाव, भागवत रावसाहेब पुयड(42), गोविंद संभाजी पुयड (39) आणि सुनिल नारायण वाघमारे (28) तिघे रा.वडगाव असे पोलीसांना सापडले. पण इतर सात ते आठ लोक पळून गेले. पोलीसांनी त्यांच्याकडून 5 हजार 500 रुपये रोख रक्कम एक मोबाईल दोन दुचाकी गाड्या असा एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 103/2026 दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. नांदेड इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांनी कार्यवाही करणाऱ्या पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 370
