![]()
आवडत्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून सुरुवात करणे गरजेच असल्याचे सांगत पारंपरिक करिअर क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र निवडण्याचे धाडस करा, असे प्रतिपादन बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा झाडबुके ठोंबरे यांनी केले. के. एल. ई. सोसायटी बेळगावी संचालित येथील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ठोंबरे बोलत होत्या. क्रीडाक्षेत्र हे करिअरसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य व मेहनत गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी तथा राज्याच्या महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला, क्रीडा, शिष्यवृत्ती परीक्षा, एनसीसी, दहावी बोर्ड परीक्षा २०२५, शासकीय चित्रकला परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्र व रोख रक्कम १ लाख ६२ हजार ७०० रुपये देऊन गौरविण्यात आले. यावेळी दहावी बोर्ड परीक्षा २०२५ मधील १०० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या तनिष्का उमेश फल्ले यावेळी धारूरकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य, कठोर मेहनत, विनम्रता यामुळे यश मिळते असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सतत प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने दरवर्षी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येतो असे सांगितले. अहवाल वाचन डॉ. महेश गणाचार्य यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय सचिन झाडबुके व सतीश होनराव यांनी करून दिला. फल्ले हिचा रोख २२ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. पारितोषिकांचे वाचन हेमंत गाढवे, गणेश ऐनापुरे, नागेश जमदाडे, शिवराज भडुळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय सचिन झाडबुके व सतीश होनराव यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक महेश गोदेपुरे, पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर, विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्व उकिरडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी समृद्धी उकिरडे उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योत्स्ना जमदाडे व सोनाली हुलमनी यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी म्हमाने यांनी मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी रवींद्र मठपती, रवींद्र मेनकुदळे, विश्वास चौधरी, संतोष बिराजदार, शिक्षक, शिक्षिका, एनसीसी विद्यार्थी, क्रीडा विभाग, सेवक यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरपेक्षा वेगळे क्षेत्र निवडण्याचे धाडस करावे:बार्शीतील कार्यक्रमात संचालिका वर्षा झाडबुके ठोंबरे यांचे प्रतिपादन
