बाभुळगावात छत्रपती शिवराय समाधान शिबिराची सांगता

0
240_177832552069ff181021719_11111.jpg




महसूल विभागाच्या वतीने बाभुळगाव मंडळात ८ मे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राजस्व समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ५ हजार ८१० लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. तसेच, नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांच्या तक्रारी तात्काळ निराकरण करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक तहसील कार्यालय परिसरात सकाळी ९ वाजता आयटीआयचे विद्यार्थी, नगरपंचायत, कृषी, महसूल, वन विभाग यांच्या सहभागातून जनजागृतीपर प्रभातफेरीने झाली. शिबिराचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा संगीता मालखुळे यांनी भूषवले. यावेळी तहसीलदार बाभुळगाव मीरा पागोरे, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, कृषी अधिकारी कृतिका डेरे, मुख्याधिकारी नगरपंचायत डॉ. पल्लवी सोटे,आरोग्य अधिकारी डॉ.संघर्ष राठोड, नायब तहसीलदार दिलीप बदली, यामीन सय्यद यांच्यासह भूमी अभिलेख विभाग, उमेद, पुरवठा विभाग, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक उपस्थित होते. प्रास्ताविकात उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली. शिबिरात आधार अपडेशन, भूमिहीन दाखला, उत्पन्न दाखला, प्रतिज्ञापत्र, अधिवास दाखला, संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजना, दुय्यम कार्ड, नवीन रेशन कार्ड, महाविस्तार ॲप नोंदणी, पी एम किसान, भूमी अभिलेखातील तक्रारी, एकत्रीकरण दुरुस्ती, फेरफार, कामगार माहिती इत्यादी सेवा देण्यात आल्या. आरोग्य विभागाने सिकलसेल तपासणी, बीपी, शुगर व डोळ्यांची तपासणी केली. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव सतीश मानलवार,भाजप शहर अध्यक्ष अनिकेत पोहेकर, शब्बीर खान, जाकीर खान, अभय तातेड,अशिष सोळंके,अमर शिरसाठ, शेख कादर, मदिना परबीन, अक्षय राऊत, प्रदीप नांदुरकर, अंकुश सोयाम, शुभम तिखे व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed