मातोश्री सौ. सरस्वतीबाई विश्वनाथराव घोरबांड यांचे निधन; आज पांगरा (महादेव) येथे अंत्यविधी

नांदेड


कंधार (जि. नांदेड): पांगरा (महादेव) येथील रहिवासी मातोश्री सौ. सरस्वतीबाई विश्वनाथराव घोरबांड यांचे अल्पशा आजाराने आज, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ०४:४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोहळा आज, सोमवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ (भाद्रपद कृष्ण दशमी) रोजी दुपारी ठीक ०२:०० वाजता पांगरा (महादेव), ता. कंधार, जि. नांदेड येथे पार पडणार आहे.

त्यांच्या पश्चात पती विश्वनाथराव जयवंतराव घोरबांड, मुले प्रल्हाद विश्वनाथराव घोरबांड (गुरुजी), पांडुरंग विश्वनाथराव घोरबांड, मारोती (बाळू पाटील) विश्वनाथराव घोरबांड (माजी उपसरपंच), तसेच घोरबांड परिवार व आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पांगरा (महादेव) व परिसरावर शोकाकुल कळा पसरली असून समस्त गावकरी मंडळींकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार घोरबांड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.


Post Views: 5










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *