पंचमुखी हनुमान मंदिराजवळ 12 तोळे सोने 3 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कमेची चोरी


नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गणेशनगर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी असलेले घर फोडून चोरट्यांनी 12 तोळे सोने, 4 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला आहे. आजच्या बाजार भावाने चांदी आणि सोन्याची किंमत जोडली तर ती जवळपास 16 लाख रुपयांपेक्षा जास्त होते.
गणेशनगर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मंथन बोरा यांचे घर आहे. त्यांची चार चाकीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त साहित्याची दुकान आहे. दि.9 डिसेंबर रोजी ते कुटूंब मुंबईला गेले होते. आज परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले दिसते. मंथन बोरा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरातून 12 तोळे सोने, 3 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेची माहिती सांगितल्यानंतर शिवाजीनगर पोलीस सोबत श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना बोलविण्यात आले होते. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Post Views: 186






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *