दुभाजकांअभावी पैठणला वाहतूक बेशिस्त:अपघाताचे प्रमाण वाढले, आगरनांदरला जाणाऱ्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू‎

महाराष्ट्र




पैठण शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर दुभाजक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये आगरनांदरकडे जाणाऱ्या दोन तरुणांसह ३ वर्षीय चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून पाहणीही करण्यात आली होती. मात्र, उपाययोजना कागदावरच राहिल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. पैठण शहरातील या मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत मोठी वर्दळ असते. तरीही प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक नसल्याने दोन्ही दिशांनी येणारी वाहने एकमेकांच्या मार्गात येतात. विद्याधन कोचिंग क्लाससमोरील आणि संकेत दुकानापुढील रस्ता अत्यंत अरुंद व धोकादायक असून तेथे वळणावर वाहनांचा अंदाज येत नाही.त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. या धोकादायक रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत पैठणचे पैठणमधील विद्याधन कोचिंग क्लाससमोरील मुख्य रस्त्यावर रविवारी घडलेला दुचाकी आणि एसटी बसचा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये समोरासमोर धडक झाल्याचे दिसत असून, याठिकाणी जर दुभाजक असते तर दुचाकीवरील तिघांचाही जीव वाचला असता, अशी हळहळ पैठण शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते कावसानकर स्टेडियम, बसस्थानक ते शहागड कमान, शिवाजी महाराज पुतळा परिसर ते नेहरू चौक, नाका रोड ते बसस्थानक, रिक्षा स्टँड ते संत ज्ञानेश्वर उद्यान या मुख्य मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ असते. Ã बस आणि दुचाकीचा अपघात समोरासमोर घडला. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली होती. सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासाठी बांधकाम विभागाला पुन्हा सूचना दिल्या जातील. – महादेव गोमारे, पोलिस निरीक्षक, पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली होती. आवश्यक उपाययोजना व सूचना फलक लावण्यासाठी त्यांनी पत्रही दिले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या उपाययोजना कागदावरच राहिल्या. या रस्त्यावर तात्काळ दुभाजक बसवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील या रस्त्यावर मोठी वर्दळ बांधकाम विभागास पुन्हा पत्र देणार

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *