तिवसा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी, रोख लंपास:कुटुंब प्रसूतीसाठी बाहेर गेले असताना घडली घटना, 10 हजार रुपयेही चोरीला




तिवसा शहरातील लुंबिनी नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी कपाटातून पाच ग्रॅम सोने, दहा ग्रॅम चांदी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता उघडकीस आली. प्रतिम माणिकराव यावले यांच्या घरी ही चोरी झाली. यावले कुटुंब पत्नीच्या प्रसूतीसाठी दोन दिवसांपासून अमरावती येथील रुग्णालयात होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रात्री १० वाजताच्या सुमारास घरात प्रवेश केला. घरात इतरत्र शोधाशोध करून चोरट्यांनी कपाटातील वस्तू चोरल्या. पत्नीच्या प्रसूतीनंतर नव्या पाहुण्यासह कुटुंब घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *