Mizoram is the gateway to Myanmar’s drugs; 846 crores worth of drugs seized, 930 people arrested, criminals trade drugs across 510 km of open border

देश-विदेश

[ads1]

  • Marathi News
  • National
  • Mizoram Is The Gateway To Myanmar’s Drugs; 846 Crores Worth Of Drugs Seized, 930 People Arrested, Criminals Trade Drugs Across 510 Km Of Open Border

सत्यनारायण मिश्रा | आयझोल13 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

म्यानमारमधून येणाऱ्या अमली पदार्थांसाठी मिझोराम एक प्रवेशद्वार बनत आहे. ५१० किलोमीटर लांबीच्या सीमेचा फायदा घेऊन, तस्कर वन व सीमावर्ती गावांमार्फत हेरॉइन, मेथाम्फेटामाइन भारतात आणत आहेत. गेल्या आठ महिन्यांत, ८४६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून, १११ परदेशी नागरिकांसह ९३० जणांना अटक केली आहे.

ईडीच्या कारवाईत, म्यानमारचा सूत्रधार थांगचिंटुआंग ऊर्फ ​​चिंटुआंग याच्याशी संबंधित २२ बँक खात्यांमधून ४.८ कोटी रु. जप्त केले. हे नेटवर्क सीमापार वाहतूक, पुरवठा व हवालामार्फत पेमेंट यासह ड्रग्ज खरेदीवर नियंत्रण ठेवत होते हे तपासात उघड झाले.

हवाला, बनावट खाती,खोट्या कंपन्यांद्वारे व्यवसाय चालतो

अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा लपवण्यासाठी करण्यासाठी या नेटवर्कने अनेक स्तर तयार केले. विविध व्यक्ती व बनावट कंपन्यांच्या नावावर डझनभर बँक खाती उघडली, ज्यामुळे निधी इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करणे शक्य होत होते. अनेक ‘म्यूल’ खाती मनी लाँड्रिंगसाठी वापरली. हवाला नेटवर्कद्वारेही पैसे दिले जात होते, ज्यामुळे निधीचा खरा स्रोत शोधणे कठीण झाले. तपासात काही ऑपरेटर्सच्या खात्यांमध्ये ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. चिंटुआंगने अनेक भारतीय बँक खात्यांची माहितीही दिली. या आधारे ईडीने ही रक्कम जप्त केली.

दुहेरी साखळी : कच्चा माल भारतातून, म्यानमारमधून ड्रग्ज

तस्करीचे जाळे म्यानमारमधून भारतात अमली पदार्थ पाठवण्यापुरते मर्यादित नव्हते. स्यूडोएफेड्रिनच्या गोळ्या व कॅफीन ॲनहायड्रस यांसारखी रसायने भारतातून, विशेषतः गुजरातमधून मिझोराममार्गे म्यानमारला नेली जात होती. तेथील बेकायदेशीर प्रयोगशाळांमध्ये अमली पदार्थ तयार करण्यासाठी यांचा वापर केला जात असे. तयार अमली पदार्थ नंतर मिझोराममार्गे भारतात परत आणले जात, अशा प्रकारे ही एक दुहेरी साखळी कार्यरत होती. ईडीच्या पूर्वीच्या तपासातून कोट्यवधी रुपयांच्या पूर्वसूचक रसायनांचा पुरवठा आणि हवाला व्यवहारांशी संबंधही उघड झाले आहेत.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *