महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावरही फडणवीसांनी टीका करत हा मोर्चा म्हणजे “हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न” असल्याचं म्हटलं. तसेच विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि 2026 मधील SIR प्रक्रियेचा संदर्भ देत विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाकडून सक्षम उमेदवार देण्यात आले असून उर्वरित दोन जागांवर महायुतीतील मित्रपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनीच निवडणूक लढवावी, तर उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी माघार घ्यावी, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. पक्षांतर्गत नाराजी किंवा इच्छुकांमध्ये असलेल्या मतभेदांवर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे आणि सुधाकर कोहळेंवर विश्वास पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीचा फडणवीसांनी विशेष उल्लेख केला. पदवीधर मतदारसंघासाठी त्या सक्षम उमेदवार असल्याचे सांगत त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे शिक्षण क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. शिक्षकांमध्ये त्यांचे चांगले काम असल्याचा दावाही त्यांनी केला. तर नागपूर पदवीधर मतदारसंघातील सुधाकर कोहळे यांच्याकडे राजकीय आणि संघटनात्मक अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. कोहळे यापूर्वी आमदार राहिले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर फडणवीसांचा निशाणा दरम्यान, ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावरही फडणवीसांनी टीका केली. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. “हा मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न होता,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. मोर्चासाठी मोठी हाइप तयार करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही फारसे लोक सहभागी झाले नसल्याचे त्यांनी म्हटले. ‘गजनी झाले आहेत’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचा टोला निवडणुकीतील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवर फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. “हे सातत्याने म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झाली आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. SIR मुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. मी यांना आठवण करून देतो, कारण हे गजनी झाले आहेत,” अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केले. यानंतर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीचा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांचा कालक्रम मांडला. ज्ञानेश कुमार 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली. त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीवर 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या व्यक्तीचा प्रभाव कसा असू शकतो, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. ‘2024 ची निवडणूक, 2025 मध्ये नियुक्ती आणि 2026 मध्ये SIR’ देवेंद्र फडणवीसांनी आपल्या टीकेचा आधार तीन वेगवेगळ्या कालखंडांवर ठेवला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली. ज्ञानेश कुमार 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया 2026 मध्ये होत आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडून निवडणूक आयोगावर आरोप करणे चुकीचे असल्याचे फडणवीसांनी सांगितले. विरोधकांनी केलेले आरोप तथ्यांवर आधारित नसल्याचा दावाही त्यांनी केला. ‘खोटं बोलत असाल तर ते सत्य वाटेल असं तरी बोला’ विरोधकांच्या आरोपांवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी, “आपण खोटं बोलत असलो तर ते सत्य वाटेल असं तरी बोललं पाहिजे,” असा टोला लगावला. विरोधक धडधडीत असत्य आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. लोकांनी नाकारल्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय अस्वस्थतेचा राग निवडणूक आयोगावर काढला जात असल्याची टीकाही फडणवीसांनी केली. निवडणुकीतील पराभव किंवा राजकीय नुकसान स्वीकारण्याऐवजी संस्थांवर आरोप करण्याचा मार्ग विरोधकांनी स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापणार ठाकरे बंधूंचा मोर्चा, SIR प्रक्रिया, मतदारयादीतील बदल आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला राजकीय प्रत्युत्तर देत त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांनाही थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात SIR आणि निवडणूक आयोगाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा… MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांचा पाठिंबा:फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, ‘प्रशासनातील एका पिढीला बरबाद करण्याचं पाप कुठे फेडाल?’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमितता आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांकडूनही पाठिंबा मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘सरकारने विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असतील, तर मग विद्यार्थी अजूनही आंदोलनस्थळी का बसले आहेत?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचा…
ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे ‘हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांचा टोला, निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर