![]()
मराठा आरक्षणासाठी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर निर्माण झालेला सामाजिक बदल आता थेट जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येत आहे. १९६७च्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले जिल्ह्यातील ७० उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवत नशीब आजमवत आहे. १७ ओबीसीच्या जागेसाठी ३१ तर २९ गणासाठी ३९नवीन ओबीसींनी अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षांनीही या नवीन ओबीसींना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देत संधी दिल्या आहेत. राज्यभरात मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा राहीला आहेत. याचा मुद्द्यावर लोकसभा आणि विधासभा निवडणूका पार पडल्या त्यानंतर न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने जुन्या नोंदीचा शोध घेतला. त्यात आॅक्टोंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत १ हजार ८८४ गावांतील नोंदी तपासल्यानंतर मराठवाड्यात २ लाख ५६ हजार ५०५ नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्राची वाटप करण्यात आली. आरक्षण मिळालेल्यापैकी अनेकांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत उतरले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी नव्याने ओबीसी आरक्षण मिळालेल्या ७० जणांना संधी दिली आहेत. शिवसेनेने १८, भाजपने १६ उमेदवारांना संधी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत ओबीसीच्या गट व गणासाठीच्या जागेसाठी ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले मराठा समाजाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहेत. यात शिवसेनेने (शिंदे) १८ उमेदवार तर त्यापाठोपाठ आमचा डिएनए ओबीसी सांगणाऱ्या भाजपने गट व गणासाठी १६ जणांना संधी दिली आहेत. तर अपक्ष म्हणून गटासाठी ३ व गणासाठी ७ नवे ओबीसी रिंगणात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ओबीसीतून नशीब आजमावणाऱ्यांना मतदार कशी साथ देणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. सर्वांधिक उमेदवार गंगापूर व पैठणमधून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत गंगापूर तालुक्यातून गटासाठी ६ तर गणासाठी ७ जण रिंगणात आहेत.त्यापाठोपाठ खासदार संदीपान भूमरे यांच्या बालेकिल्ल्यात जिल्हा परिषद गटासाठी ५ तर गणासाठी ३ रिंगणात आहे. विशेष म्हणजे भाजप,सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने नव्याने कुणबी प्रमाणपत्रे मिळलेल्यांना संधी दिली आहे. ५० जणांची माघार या निवडणूकीत २७ जानेवारीपर्यंत ११९ जण रिंगणात होते.त्यात ४१ अपक्षांनी गण आणि गटातून अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घेतली.
यासह सर्व राजकीय पक्षांनी ९ उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले. त्यामुळे ५० जणांनी माघार घेतल्यामुळे आता ६९ जण रिंगणात आहेत. पुणे-पिंप्रीचिंचवड मनपात ५२ नगरसेवक नव ओबीसी नुकत्याच पार पडलेल्या महानगपालिका निवडणूकीतही ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले नव ओबीसींनी बाजी मारली आहे. पुण्यात १६५ जागापैकी २६ ओबीसी जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी कुणबी म्हणून निवडून आले आहे. तर पिंप्रीचिंचवड मधील १२५ मध्ये २६ जागावर नव ओबीसी निवडून आले आहेत. निवडून आलेल्या या ५२ नव ओबीसींना मृणाल ढोले पाटील यांनी दर्शविला आहे. जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली आहे. जुन्या नोंदीवरून प्रमाणपत्र- विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते जुन्या नोंदीच्या आधारे १९६७ नुसार प्रमाणपत्र मिळालेले कुणबी उमेदवार निवडणूक लढवत आहे. कायद्याच्या आधाराने त्यांना हक्क मिळाला आहे. या नोंदी आताच्या नाही, त्या जुन्याच आहेत. परंतु निवडणूकीमुळे ते चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणूकीत खुल्या जागेवर राजकीय पक्षांनी इतर प्रवर्गातील लोकांना उभे केले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक:नव्याने ओबीसी झालेले 70 मराठा बांधव रिंगणात, सर्वच पक्षांनी दिली उमेदवारांना संधी
