काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित असल्याने नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी आपला जोरदार प्रचार सुरु केला आहे. देशात नुकतेच झालेले कॉक्रोज जनता पक्षाचे आंदोलन आणि ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण याचा या निवडणुकीत मोठा प्रभाव राहणार असून यात काँग्रेसचाच विजय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. सरकारची ही लिटमस टेस्ट असून राज्यातील जनता ही कोणाच्या बाजूने आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल, असेही अभिजित वंजारी यांनी ठामपणे सांगितले. अभिजित वंजारी येत्या 5 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसने आपले पत्ते उघड केले असले तरी, भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्या विरोधात भाजपकडून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुधाकर कोहळे यांची प्रचारात आघाडी नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसला तरी, संभाव्य उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. उमेदवारी कोणाला पण मिळो, भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणायचे आहे. यासाठी आमची तयारी सुरु झाली असून मी देखील प्रचाराला सुरवात केली आहे, असे सुधाकर कोहळे यांनी सांगितले. या प्रचार मोहिमेदरम्यान त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या काय आहेत, त्या समजून घेतल्या. भाजपच्या अधिकृत उमेदवाराबाबत उत्सुकता सध्या भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून मोठी चुरस रंगली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा असल्याने भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या दिग्गज नेत्यांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा विजय कोण खेचून आणणार आणि पक्ष नेमका कोणावर आपला डाव आजमावणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ॲड. रमण सेनाड यांची उमेदवारीची मागणी एकीकडे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढली असून संघ परिवारातील इच्छुकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामचे विदर्भसह प्रांतप्रमुख ॲड. रमण सेनाड यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. मी मागच्या पन्नास वर्षांपासून संघ परिवाराचे काम करतो, तीस वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. अनेक वेळा मी उमेदवारी मागितली, मात्र पक्षाने तिकीट नाकारली. तरी प्रामाणिकपणे पक्ष व संघाचे काम सुरु ठेवले. मुख्यमंत्री माझ्याबद्दल सकारात्मक असून यावेळेस मला उमेदवारी भेटेल, असा विश्वास ॲड. रमण सेनाड यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर पदवीधर निवडणूक:काँग्रेसचे अभिजित वंजारी मैदानात, 5 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज; भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता