अमरावतीसह राज्याच्या अनेक भागांत यंदा कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे. यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पन्न नाही. या गंभीर स्थितीमुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी एसडीओ अनिल भटकर यांच्या कार्यालयासमोर ‘हल्लाबोल आंदोलन’ केले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. संघटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई, नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि प्रलंबित पीक विमा लगेच खात्यात जमा करण्याची मागणी केली. २०१९ पूर्वीचे पीक कर्ज माफ करावे, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना आर्थिक पॅकेज द्यावे, जनावरांसाठी चारा-पाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, वीजबिल व कर्जवसुली थांबवावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष स्वप्नील भुयार, शहराध्यक्ष नंदकिशोर शेरे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
अमरावतीत दुष्काळामुळे शेतकरी संकटात, क्रांतिकारी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन:एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने करत एक लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी.