![]()
गिरणारे गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी -जास्त व्होल्टेजमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. भाजपच्या वतीने मंगळवारी इगतपुरी येथील महावितरण कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वीज खंडित असलेल्या प्रत्येक तासासाठी ग्राहकाला १०० रुपये भरपाई द्या, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अकिब अब्दुल समद शेख, दिलीप भीमराव नरोडे, सुनील संतू पाटील, इनामूल्ला बिस्मिल्लाह शेख, रामसिंग प्रेमसिंग भंडारी, श्रीकांत आंबेकर आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गिरणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. मात्र, त्वरित कृती न झाल्यास लोकशाही मार्गाने याहून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा ॲड. मुन्ना पवार यांनी दिला आहे.
गिरणारेत वीजपुरवठा खंडित; अधिकाऱ्यांना घातला घेराव:वीज खंडित झाल्यास ताशी 100 रुपये भरपाई द्यावी
