Dattatray Bharane Statement on Devendra Fadnavis National Leadership


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. मात्र, आता थेट महायुती सरकारमधील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच “देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे,” अशी उघड इच्छा व्यक्त केल्याने राजकीय

.

पांडुरंगाला साकडं घालणार

“चांगली माणसं आपल्या भविष्यासाठी महाराष्ट्रातच राहिली पाहिजेत. मात्र, महाराष्ट्र खूप दिवसांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. तेव्हा मी पांडुरंगाला एकच साकडं घालेन की, योग्य वेळी आमच्या देवाभाऊंना या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी,” असे भरणे म्हणाले. त्यांच्या या विधानाला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

अतिवृष्टीच्या काळात सरकारने मदत केली

भरणे यांनी मागील वर्षीच्या अतिवृष्टीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, पिकांचे मोठे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला.

“बोलणं सोपं असतं, पण निर्णय घेऊन मदत करणं कठीण असतं. निवडणुका नसतानाही शेतकरी उभा राहिला पाहिजे, या भावनेतून सरकारने मदत केली,” असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी

राज्य सरकार 7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या कृषी पंपांसाठी दरवर्षी 25,000 कोटी रुपयांची मदत वीज बिलापोटी करत आहे. तसेच, ‘नमो शेतकरी’ आणि ‘पीएम किसान’ योजनेतून आतापर्यंत 57,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

विरोधकांवर टीका

सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. पण, एखाद्या विद्यार्थ्याला 90 टक्के मार्क मिळाले तरी त्याला 10 टक्के कमी का मिळाले, याचाच प्रचार विरोधकांकडून सध्या केला जात आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कृषिमंत्री भरणे यांनी केलेल्या आवाहनानुसार, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता सरकारचे शेतकरी हिताचे निर्णय आणि 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच, राज्यात कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘महिला शेतकरी धोरण’ प्रभावीपणे राबवण्यावर सरकार भर देणार आहे.

पालघरमध्ये उभारला जाणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

शेतकऱ्यांच्या हिताचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगताना भरणे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील दापचेरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, साठवण आणि विक्रीच्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातमी वाचा..

शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार!:48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; कर्जमाफीनिमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, लवकरच राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *