जुलै अर्धा संपला; महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाची दडी:लातूर, परभणी, यवतमाळसह सोलापुरातही मोठी तूट




राज्यात जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने राज्यात पुढील किमान पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्ट दिसत असून, पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणीसह यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने गेल्या ४८ तासांत या भागातील पाऊस थेट शून्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *