नवी मुंबईत राडा!:भाजप-शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, माजी महापौरच्या समोरच तूफान हाणामारी

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-01-14t212245211_1768405873.jpg




महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशीच अनेक ठिकाणी राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कुठे पैसे वाटल्याच्या कारणाने राडा होत आहे, तर कुठे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होत आहेत. असेच काहीसे चित्र नवी मुंबईत बघायला मिळाले आहे. येथील घणसोली परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली आहे. भाजपचे नेते व माजी महापौर यांच्या उपस्थितीतच ही हाणामारी झाली. मंगळवारी रात्री घणसोली येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि या वादाचे रूपांतर थेट हाणामारीमध्ये झाले होते. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, महायुतीमधील घटक पक्षांमध्येच हा राडा होत असल्याने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे एकत्रित निवडणूक लढवत असले तरी काही ठिकाणी धुसफूस सुरूच असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम आता निवडणुकीवर कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ताडदेवमध्ये भाजप-शिवसेना ठाकरे गटात राडा! मुंबईतील ताडदेव परिसरात महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी काही तास शिल्लक असताना पैशांच्या वाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजप कार्यकर्ते प्रदीप छेडा, प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैशांचे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी केला आहे. वाचा सविस्तर

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks