Amravati Municipal Corporation: Campaigning will stop today | अमरावती महापालिका: प्रचाराचे भोंगे आज थांबणार: 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल; भाजप, सेना, राकाँ, एमआयएमच्या सभांचा जोर – Amravati News



अमरावती महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार आज, मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार आहे. यानंतर गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणार असून, त्

.

अमरावती शहरातील २२ प्रभागांमधून एकूण ८७ नगरसेवक निवडून येणार आहेत. यासाठी ६६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी भाजप उमेदवारांसाठी सभा घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी ‘रोड शो’ देखील केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी जनमताचा कौल मागितला. या सर्व नेत्यांनी विकासाचे व्हिजन मांडत अमरावतीला विकसित शहर बनवण्याचे आश्वासन दिले.

याच काळात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जाहीर सभा घेऊन इतर पक्षांवर टीका केली. एमआयएम हा जनतेसाठी लढणारा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रचारात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष मात्र काहीसे मागे पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावतीचा दौरा केला, परंतु त्यांची कोणतीही जाहीर सभा झाली नाही. त्यांनी काही प्रभागांमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवारांसाठी मते मागितली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाही कोणताही मोठा नेता अद्याप अमरावतीत प्रचारासाठी आला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवसांत दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता व्यक्त केली होती, परंतु तसे काहीही घडले नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार अरविंद सावंत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभा होण्याची चर्चा होती. शिवसेना जिल्हा प्रमुख पराग गुडधे आणि काँग्रेस महानगर अध्यक्ष बबलू शेखावत यांनीही आपापल्या नेत्यांच्या सभांची शक्यता वर्तवली होती, मात्र यापैकी कुणीही प्रचारासाठी आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *