Thane Shivshakti Uddhav Thackeray Raj Thackeray Live Sabha | एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा: ठाण्यातून धर्मवीर आनंद दिघेंची पाटीच गायब, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल – Mumbai News
![]()
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडत आहे. ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. याच ठाण्यात आज ठाकरेंची तोफ धडाडली. या सभ
.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत यावेळी भाष्य केले. त्या म्हणाल्या, गेली चार दिवस झाले माध्यमे आकडे दाखवत आहेत, कोणाकडे किती नगरसेवक आहेत त्याचे. आम्हाला नम्रपणे त्यांना सांगायचे आहे, जे आकडे तुम्ही दाखवत आहात, त्या सगळ्यांच्या एबी फॉर्मवर 2017 साली ठाकरेंची सही होती. ते सगळे आकडे जे निवडून आले, त्यांना ठाकरेंकडे बघून मते मिळाली होती. त्यामुळे आम्ही त्या आकड्यांची चिंता करत नाही.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या लोकांनी धर्मवीर चित्रपट काढला, त्या धर्मवीर नावाची पाटीच आज ठाण्यात दिसत नाही. ते सांगतात, बाळासाहेबांचे विचार आम्ही जपले, तर माझे साधे दोन प्रश्न आहेत, गणेश नाईकांनी असे म्हटले होते की टांगा पलटा घोडे फरार करेल, पण हे वाक्य आपल्याबद्दल बोलले असते तर आपण आत्तापर्यंत त्यांच्या घरात घुसलो असतो. पण त्यांनी पलटून उत्तरही दिले नाही. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतात, अशी टीका अंधारे यांनी केली.
