Police Arrest Suspects Bank Employee Robbery Vasmat | वसमत बँक कर्मचारी लूट प्रकरण: कुरुंदा पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीला बेड्या, अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना – Hingoli News



वसमत तालुक्यातील कोर्टाफाटा शिवारात बँक कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या आणखी एकास पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. १० अटक केली आहे. या शिवाय अन्य आरोपींच्या शोधासाठी कुरुंदा पोलिसांचे पथक रवाना झाले असून पुढील दोन दिवसांत या प्रकरणाचा गुंता सुटणार असल्याचे पोलिस

.

पोलिसांनी दिले्ल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्याचे कोर्टा फाटा शिवारात ८ लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी ता. ९ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन कुरुंदा पोलिसांना आवश्‍यक सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार संदीप टाक, भगीरथ सवंडकर, गजानन भालेराव यांच्या पथकाने तातडीने माहिती घेऊन ओंकार कदम (रा. भोगाव), सत्यम इंगोले (रा. पळसगाव) या दोघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी या घटनेतील इतरांची माहिती दिली. या प्रकरणात लुटलेली रक्कम वाटून घेण्याचे ठरल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पाच दिवसांपासून रेकी सुरु होती असेही स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या ओंकार व सत्यम यांना आज वसमत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी इतर आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली असून त्यामध्ये ओंकार गव्हाणे (रा. भोगाव) याचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने आज त्याला अटक केली आहे.

या प्रकरणात अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके मराठवाड्यासह इतर जिल्हयात रवाना झाली आहेत. या पथकाकडून उर्वरीत आरोपी लवकरच ताब्यात येतील असा दावा पोलिसांनी केला आहे. सर्व आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा…

हिंगोली, वसमतमध्ये उपनगराध्यक्ष पदाचा तिळगुळ कोणाला मिळणार?:पहिली सभा शुक्रवारी, कळमनुरीत शिवराज पाटील यांची वर्णी

हिंगोली पालिकेची पहिली सर्व साधारण सभा शुक्रवारी ता. १६ रोजी होणार असून उपनगराध्यक्षपदाची तिळगुळ कोणाला मिळणार याची उत्सूकता राजकिय वर्तुळाला लागली आहे. तर दुसरीकडे कळमनुरीत शिंदेसेनेचे शिवराज पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *