[ads1]
![]()
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेत तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांना कर्तव्य बजावत असताना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. ही घटना समोर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. गणेश विसर्जनामुळे ठाण्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बंदोबस्तादरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना चक्कर आल्याने ते कर्तव्याच्या ठिकाणीच कोसळले. शिंदेंनी स्वतः घेतली मदतीची जबाबदारी नलावडे यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नलावडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. नलावडे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. विशेष म्हणजे, शिंदे यांनी स्वतः रुग्णवाहिकेला ताफ्यातून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नलावडे यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. उपचाराचा खर्चाची चिंता करू नका रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून नलावडे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच उपचाराच्या खर्चाची चिंता करू नका, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संजय नलावडे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. शिंदे हे त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून सातत्याने माहिती घेत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात पोलिस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या जबाबदारीने कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्याची प्रकृती बिघडल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले आहेत. हेही वाचा…. बीएमसीचा अजय देवगणला दणका!:जुहूतील बंगल्याचे काम थांबवण्याची नोटीस; सलून-स्पाच्या व्यावसायिक वापरावरून वाद बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याशी संबंधित प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जुहूतील देवगण कुटुंबाच्या मालकीच्या बंगल्यात सुरू असलेल्या प्रस्तावित सलून आणि स्पाच्या कामाला स्थगिती देण्याची नोटीस बजावली आहे. संबंधित जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पालिकेने ही कारवाई केली आहे. सविस्तर वाचा…
[ads2]
कर्तव्यावर पोलिस अधिकाऱ्याला अचानक चक्कर:एकनाथ शिंदे स्वतः मदतीला धावले, रुग्णवाहिकेसोबत थेट रुग्णालय गाठले!
















Leave a Reply