[ads1]
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त नांदेड शहरात २५ सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर
नांदेड (प्रतिनिधी) – श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात २५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, भा.पो.से. यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये २५ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून ते रात्री २४:०० वाजेपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
वाहतुकीसाठी बंद असणारे प्रमुख मार्ग:
- बर्की चौक ते जुना मोढा: जुना मोढा – देना बँक – महावीर चौक – तरोडेकर मार्केट – वजिराबाद चौक दरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- जुना मोढा ते आय.टी.आय. चौक मार्ग: कलामंदिर – शिवाजीनगर ते आय.टी.आय. चौक दरम्यान दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- राज कॉर्नर ते आय.टी.आय., डावी बाजू: राज कॉर्नरकडून आय.टी.आय. कडे येण्यासाठी डावी बाजू वाहतुकीसाठी बंद राहील.
- राज कॉर्नर ते तरोडा नाका: राज कॉर्नरवरून तरोडा नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची डावी बाजू वाहतुकीसाठी बंद राहील.
- सिडको/हडको ते जुना मोढा: हडको भागाकडून कौठा नाका मार्गे नवीन पुलावरून जुन्या मोढ्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- जुना मोढा ते सिडको/हडको: जुन्या मोढ्यातून नवीन पुलामार्गे सिडको/हडकोकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
नागरिकांसाठी पर्यायी मार्ग:
- बर्की चौकाकडून जुन्या मोढ्याकडे जाण्यासाठी: वाहनधारकांनी महंमद अल्ली रोड – भंगार लाईन – गिट्टी क्रशर चौक – बाफना टी-पॉईंट या मार्गाचा वापर करावा.
- जुना मोढा ते राज कॉर्नर दरम्यान प्रवासासाठी: अबचलनगर – यात्री निवास – अण्णाभाऊ साठे चौक – नाईक चौक – आनंद नगर – भाग्यनगर – वर्कशॉप कॉर्नर मार्गे राज कॉर्नरकडे जावे.
- वजिराबाद चौकाकडून श्रीनगर/वर्कशॉपकडे जाण्यासाठी: वजिराबाद चौक – तिरंगा चौक – पोलीस मुख्यालय कॉर्नर – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजी नगर, पिवळी गिरणी ते गणेश नगर वाय पॉईंट या मार्गाचा वापर करावा.
- रवीनगर, जुना कौठा, गोवर्धन घाट पुलावरून शहरात येण्यासाठी: पोलीस मुख्यालय कॉर्नर – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजी नगर, पिवळी गिरणी ते गणेश नगर वाय पॉईंट या मार्गे शहरात प्रवेश करावा.
- सिडको / हडको भागातून शहरात येण्यासाठी: साई कमान – रवीनगर – गोवर्धन घाट नवीन पूल – तिरंगा चौक – पोलीस मुख्यालय कॉर्नर – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजी नगर, पिवळी गिरणी ते गणेश नगर वाय पॉईंट या मार्गाचा अवलंब करावा.
- जुन्या मोढ्यातून सिडको/हडकोकडे जाण्यासाठी: भगतसिंग रोड – कविता हॉटेल – बाफना – देगलूर नाका – जुना पूल या मार्गाचा वापर करावा.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व वाहनचालक, भाविक व शहरवासीयांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १२ या कालावधीत आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाने निर्देशित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, भा.पो.से. यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे.

Post Views: 94
[ads2]
















Leave a Reply