पीएमपी बसमधील तरुणीच्या पिशवीतून 2 लाखांची रोकड लंपास:हडपसर भागात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून चोरी; शहरात 4 घटना

[ads1]


पुणे शहरात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड चोरली. ही घटना हडपसर भागात घडली असून, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तरुणीला लुटले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी हडपसर ते बालेवाडी दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होती. भेकराईनगर येथील बस थांब्यावर खूप गर्दी होती. याच गर्दीत चोरट्यांनी तिच्या पिशवीतून दोन लाख रुपये काढून घेतले. ही तरुणी हडपसर भागात राहते. पोलीस उपनिरीक्षक एस. शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच दरम्यान, पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील दोन लाख दहा हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कटरने बांगडी कापून घेतली. या घटनेप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कात्रजमधील सुखसागरनगर भागात राहणाऱ्या या महिलेने तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. आणखी एका घटनेत, पीएमपी बसमधील एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ७८ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरण्यात आली. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिली आहे. याशिवाय, शिवाजीनगर येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात एका ज्येष्ठ एसटी प्रवाशाच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली. मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ते एसटी बसने प्रवास करत असताना ही चोरी झाली. पोलीस उपनिरीक्षक एन. काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. हेही वाचा.. गणेशोत्सवाच्या गर्दीत महिलांचे दागिने चोरीला:कसबा पेठ आणि शनिपारमध्ये तीन घटना; फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल गणेशोत्सवाच्या गर्दीत देखावे पाहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कसबा पेठ आणि शनिपार परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी चोरांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *