रंगकाम करणाऱ्या मजुराच्या लेखणीची कमाल!:कवी सुनील उबाळे यांच्या 'माणूस' कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश




डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील कवी सुनील उबाळे यांच्या यांच्या माणूस कवितेचा समावेश करण्यात आला आहे. उबाळे यांच्या ‘उलट्या कडीचं घर’ या कवितासंग्रहातली ही कविता आहे. बी. ए. तृतीय वर्षाच्या सहावे सत्रातील अभ्यासपत्रिका क्रमांक ८ मधील “मराठवाडी कविता” या भागात या कवितेचा विद्यार्थी अभ्यास करणार आहेत. या बद्दल उबाळे यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. ‘एका रंग काम करणाऱ्या साधारण कवीसाठी हा केवळ सन्मान नसून, त्याच्या लेखणीवर समाजाने ठेवलेला विश्वास आहे. हा सन्मान समस्त लिहित्या हातांचा आहे. मी मनापासून निवड समितीच्या ऋणात राहतो तसेच माझ्या पैठणगेट सारख्या वसतिसह मित्र परिवार या आनंदात सहभागी आहे. शताब्दी काव्य मंडळ या कवितेनं मंतरलेल्या समुहाने मी समृद्ध झालोय,’ अशी भावना उबाळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *