[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये जबरी चोरीची घटना घडली असून, नांदेड ग्रामीण व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या आहेत. या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाईल हिसकावताना पतीला मारहाण :
नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन तांडा बारसमोर २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या पत्नीच्या जवळील मोबाईल फोन हिसकावून घेतला. यावेळी फिर्यादीच्या पतीने प्रतिकार केला असता आरोपीने त्याच्या डोक्यावर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी रत्नमाला शिवाजी गायकवाड (वय ३०, रा. मिर्जापूर, ता. देगलूर) यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८३/२०२६, कलम ३११ बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुलंगे करीत आहेत.
कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये ७.९० लाखांची घरफोडी :
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या कौठा येथील श्रीपाद नगर, कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये २१ सप्टेंबर रोजी पहाटे २ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नवदिप अप्पाराव जाधव (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
मांडवीत बारमधून ६४,९९५ रुपयांचा ऐवज चोरीस :
किनवट तालुक्यातील लक्की बार, बोध फाटा येथे १८ ते १९ सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्याने बारच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बारमधील विदेशी व बिअर, कॅमेऱ्याचे डीव्हीआर व रोख रक्कम असा एकूण ६४ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कोडच्या इलय्या इरकोटे, (वय ५७, रा. उमरी बाजार, ता. किनवट) यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११०/२०२६, कलम ३३४(४), ३०५ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पोखळी/अस्वले करीत आहेत.

Post Views: 282
[ads2]
















Leave a Reply