[ads1]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी ज्या प्रकारची टीका करतात, ती देशातील जनता कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी सत्तेत येण्याच्या घाईत बेभान सुटले आहेत; परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी 140 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्याच पाठीशी ठाम उभी
.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज जगातील प्रत्येक देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिमा उंचावली आहे. जगातील 50 हून अधिक देशांनी त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिला आहे. अशा जागतिक स्तरावरील नेत्यावर आणि आपल्या पंतप्रधानांवर केलेली बेताल टीका आम्हाला अजिबात मान्य नाही. काँग्रेस काहीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करो, जनता राहुल गांधींसोबत नसून मोदींसोबतच आहे.
दुष्काळ आणि शेतकरी मदतीवर सरकारचे लक्ष
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मविआचे खासदार दुष्काळाबाबत पंतप्रधान मोदींना भेटणार असतील, तर त्यांनी राज्यातील वस्तूस्थिती नक्की मांडली पाहिजे. सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेला न्याय देणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकारी माहिती सादर करतील, त्यानंतर परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले जातील. 2017-18 मध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली होती, तसेच ठोस निर्णय सरकार घेईल.
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एसआयआरमध्ये बूथ लेव्हलवर काम करण्याची संधी सर्वच राजकीय पक्षांना असते. नावे नोंदवण्यासाठी अजूनही पुरेसा वेळ उपलब्ध आहे. मात्र, काँग्रेस निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ राजकारण करण्यासाठी आणि सरकारसह निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी एसआयआरच्या नावाने खडे फोडत आहे.
हे ही वृत्त वाचा
राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा यु-टर्न:अखेरच्या क्षणी राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द, म्हणाले- सर्व काही गमावले तरी काँग्रेससोबतच राहीन

बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राज्य राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. स्वतः बोंद्रे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तबही केले होता. मात्र, या राजकीय नाट्यात थेट दिल्लीतून सूत्रे हलली आणि राहुल गांधी यांनी फोन करून मनधरणी केल्यानंतर बोंद्रे यांनी आपला निर्णय मागे घेतला. भाजपच्या उंबरठ्यावरून बोंद्रे माघारी फिरल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply