Mhada Lottery Pune | पुणेकरांसाठी गुडन्यूज! म्हाडाच्या 295 घरांसाठी लॉटरी; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

0
mm.jpg


Mhada Lottery Pune | पुणे (Pune) गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (Mhada) घर शोधणाऱ्या नागरिकांसाठी एक विशेष योजना आणली असून, विविध वसाहतींमधील २९५ सदनिकांच्या विक्रीची घोषणा केली आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची अट ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अशी असून, ४ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी आणि सदनिका निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गृहप्रकल्प

या विशेष मोहिमेत पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्रातील ११३ सदनिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्रातील १८२ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने १आरके, १बीएचके आणि २बीएचके या प्रकारातील घरांचा समावेश असून ती २० टक्के सर्वसमावेशक आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील शिल्लक राहिलेली घरे आहेत. चिखली (Chikhali), वाकड (Wakad), हडपसर (Hadpsar), बालेवाडी (Balewadi) आणि वाघोली (Wagholi) यांसारख्या विकसित भागांतील गृहप्रकल्पांचा यात समावेश असल्याने इच्छुकांना त्यांच्या पसंतीनुसार घर निवडता येईल.

अर्जदारांनी https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या प्रक्रियेत सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. जर विहित मुदतीत ही रक्कम भरली नाही, तर त्या सदनिकेवरील अर्जदाराचा हक्क संपुष्टात येईल आणि ती घर पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) २०,००० रुपये अनामत रक्कम आणि ७०८ रुपये अर्ज शुल्क (जीएसटीसह) असा एकूण २०,७०८ रुपयांचा प्रारंभिक भरणा करावा लागेल. अर्जदाराने गेल्या दोन आर्थिक वर्षांतील (२०२४-२५ व २०२५-२६) उत्पन्नाचा अधिकृत पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पार पडणार असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाला किंवा एजंटला बळी पडू नये, असा इशारा म्हाडाने दिला आहे. यशस्वी अर्जदारांना संबंधित गृहनिर्माण संस्थेचे सभासद व्हावे लागेल आणि मालमत्ता करासह इतर देखभाल शुल्काची जबाबदारी स्वीकारवी लागेल. अधिक माहितीसाठी पुणे गृहनिर्माण मंडळाच्या आगरकर नगर (Agarkar Nagar) येथील कार्यालयात किंवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

News Title: Mhada Pune lottery 295 flats on first come basis

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed