[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये डीआयजी पथकाने मारलेल्या छाप्यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असली, तरी या कारवाईदरम्यान आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सध्या शहरात अत्यंत खोचक आणि चविष्ट चर्चा रंगली आहे.
४३ लाखांचा साठा जप्त, पण…
पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने २० सप्टेंबर २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फत्तेबुरुज भागात छापा टाकून ४३ लाख ३३ हजार ८७४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. यात बाबा पान मसाला, राज निवास, रजनीगंधा, विमल, आरएमडी आणि मिराज तंबाखूसह इतर साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अकबर चाऊस, खयूम खान आणि मिर्झा अथर बेग या तिघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या तिघांवर यापूर्वीचे गुटखा संबंधाने अनेक गुन्हे दाखल आहेत. या तिघांना घटनास्थळावरून कडून देण्यात सुद्धा इतवारा पोलीस ठाण्यातील मोदक प्रेमीचा हातभार असल्याची चर्चा आहे.
अर्ध्या तासाचा ब्लॅकआउट आणि गुटख्याची हातसफाई?
कारवाईच्या वेळी अचानक त्या भागातील लाईट बंद करण्यात आली आणि जवळपास अर्धा तास अंधार पसरला होता. हा वीजपुरवठा गुटखा माफियांनीच ठरवून बंद करायला लावल्याची जोरदार चर्चा आहे.
- तीन घरे की एकच घर?: मिळालेल्या माहितीनुसार, गुटख्याचा साठा तीन घरांमध्ये साठवण्यात आला होता. परंतु, अर्ध्या तासाने लाईट आल्यावर साठा मात्र एकाच घरात सापडला! मग त्या अंधाराच्या अर्ध्या तासात उरलेल्या दोन घरांतील गुटखा कुठे आणि कसा गायब झाला? ही अंधारातील जादुगिरी डीआयजी पथकाच्या लक्षात आली की नाही, हा आता मोठा प्रश्न आहे.
वाघ पुरुषाची फेरी अन् सीसीटीव्हीचे फुटेज!
- इतवारा पोलीस ठाण्यातील फेऱ्या आणि सेटलमेंटचा प्रयत्न: गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा वाघ पुरुष’ इतवारा पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत होता. पोलीस ठाण्यातील स्थानिक ओळखींचा वापर करून तक्रारीतील काही नावे कमी करण्यासाठी आणि गुन्ह्याची कलमे सौम्य करण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले.परंतु यश आले नाही कारण कार्यवाही डीआयजी पथकाची होती.
पोलीस ठाण्यातील खास सहकार्य?
तक्रारीत नाव असलेल्या तीन आरोपींना पोलीस ठाण्यातीलच कोणीतरी मदत पुरवून सोय करून दिल्याची चर्चाही आता बाहेर येत आहे. डीआयजी शहाजी उमाप यांनी खबर हेल्पलाइन ९१ ५० १०० १०० सुरू करून नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. परंतु, स्थानिक पातळीवर लाईट घालवून साठा गायब करण्याचे आणि ठाण्यात जाऊन नावे कमी करण्याचे जे नाट्य घडले, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे व गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.


Post Views: 66
[ads2]
















Leave a Reply