Dinanath Mangeshkar Hospital found guilty in pregnant Tanisha Bhise’s death case, criminal case filed against 11 people including Hridaynath, Usha Mangeshkar | गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी: हृदयनाथ, उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला दाखल – Pune News



एप्रिल २०२५ मध्ये गर्भवती तनिषा भिसेचा वेळेवर उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने चौकशी अहवालात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला दोषी ठरवले आहे. त्यानुसार

.

पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच नामवंत रुग्णालयावर एवढी मोठी कारवाई झाली आहे. तनिषाला गंभीर स्थितीत मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तेथील कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांनी स्युमोटो चौकशी केली. यामध्ये उपधर्मादाय आयुक्त (पुणे) डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय शाखेचे अधीक्षक दीपक खराडे तसेच निरीक्षक सचिन बकाळ व रवींद्र गावरे यांचा समावेश होता.

११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल

चौकशीनंतर पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय व ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. यात पं. हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, अ‍ॅड. पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांचा समावेश आहे.

अहवाल आमच्याकडे पोहोचलेला नाही

धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. अहवालाशी संबंधित रुग्णाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले होते, पण कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला. डॉक्टरांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते थांबले नाहीत. – रुग्णालय प्रशासन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *