![]()
मोहोळ तालुक्यातील नांदगाव हे तालुक्यापासून १६ किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूस आहे. तीर्थक्षेत्र वडवळ नागनाथ महाराजांच्या नजीकचे गाव आहे. या गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षण माध्यमिक विद्यालय गोटेवाडी येथे शिक्षण घेतात. सदर गावामध्ये ४ दूध प्लांट असून चारही प्लांट मधून २ हजार लिटर दूध संकलन प्रत्येक दिवसाला केले जाते. प्रति लिटर ३५ रुपयाप्रमाणे प्रत्येक दिवसाला ७० ते ७५ हजारांचे दूध संकलन होते. प्रति महिना २१ ते २२ लाखांची उलाढाल दूध व्यवसायातून होते. तर या गावाला महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था नसल्याने हे गाव शिक्षणापासून वंचित आहे. साधारण या गावातील मुली या दहावीपर्यंतचा बहुतांश शिक्षण घेऊन सदर गावातील लोक सदर मुलींचा विवाह करून देण्याकडे जादा कल आहे. नांदगाव हे राष्ट्रीय महामार्गापासून ९ किलोमीटर अंतरावर आहे. किमान या गावातील १५० लोक लाकूड तोड्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायामधून प्रति दिवसाला ५०० रुपये प्रमाणे ७५ हजार रुपये प्रतिदिवस तर प्रति महिना २२ लाख ५० हजार रुपयांची मजुरी मिळवतात. याचबरोबर शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करत आहेत. सर्वाधिक लाकूडतोड व्यवसाय करत असल्याने लाकूड तोड्याचे गाव म्हणून तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाले आहे. सदर गावाच्या सीना नदी लगत गाव आहे. तलाव एक तर ओढे दोन, नाले २ आहेत. या गावाचे ग्रामदैवत पीरसाहेब आहे. एक मुस्लिम समाज घर आहे. सदर मुस्लिम समाजाची गावांमध्ये समाज कमी आहे. परंतु बाहेरगावातील मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन ग्रामदेवतांची यात्रा पार पाडली जाते. पौष महिन्यात गुरुवार, शुक्रवारी असते. पहिल्या दिवशी संदल, दुसऱ्या दिवशी उरुस, संस्कृती कार्यक्रमाने सांगता होते. सदर पीरसायबास १८ एकर जमीन आहे. सदर जमीन मशागतीसह उत्पन्न निर्मिती करण्याचा पुजाऱ्याला अधिकार ग्रामस्थांनी दिला आहे. त्याच्या वरती उपजीविका भागवतात. सदर मागासलेले गाव सदर नकाशावर आणण्याचे काम सुरू आहे. या गावाला बागायत क्षेत्र कमी आहे. शेतीसाठी जलसिंचन नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण हा दूधव्यवसायाकडे वळला आहे. या गावात चार दूध संकलन केंद्र आहे.
ग्रामदैवत पीरसाहेब यांची पौष महिन्यात यात्रा:महिन्याला 21 ते 22 लाखांची उलाढाल, शुद्ध पाण्याची सोय
