Crackdown on hoardings in Vambori, warning of action | वांबोरीत होर्डिंग लावणाऱ्यांना चाप, कारवाईचा दिला इशारा – Ahilyanagar News



राहुरी तालुक्यातील वांबोरी गावांत दर्शनी भागात तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत. काही ठिकाणी, बोर्डमुळे वळणावर अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर वांबोरी ग्रामपंचायतीने अशा ठराविक ठिकाणी फ्लेक्स लाव

.

गावातील सार्वजनिक ठिकाणी शिस्त, स्वच्छता आणि कायद्याचे पालन व्हावे, या उद्देशाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. यापूर्वी ग्रामसभांमध्येही फ्लेक्स लावण्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली होती. वांबोरीत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर तसेच मध्यशहरात फ्लेक्सचे पेव फुटले. ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी न घेता फ्लेक्स लावले जातात. सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स किती दिवस ठेवावेत, तसेच याचे शुल्क वसूल करण्याबाबत तरतूद शक्य आहे का? याबाबतही चाचपणी करून निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

आता ग्रामपंचायतीने फ्लेक्स किंवा बोर्ड लावू नयेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तशा सूचनांचे फलक ग्रामपंचायतीने डकवले आहेत. त्यात, शुभेच्छा, शोक संदेश व इतर कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स लावू नये असे स्पष्ट केले आहे. सरपंच किरण ससाणे, उपसरपंच इश्वर कुसमुडे यांच्यासह सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतूक होत आहे.

वाहतुकीस अडथळा नको ^ आठवडाभरापूर्वी झालेल्या बैठकीत फ्लेक्सबाबत निर्णय घेण्यात आला. वाहतुकीला अडचण ठरतील, अशा ठिकाणी फ्लेक्स लावण्यास मनाई केली. पुढील बैठकीत इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार फ्लेक्सबाबत बंदीचा निर्णय घ्यायचा किंवा कसे याबाबत निर्णय होईल. नागरिकांच्या जिवालाच धोका होणार असेल, तर मनाई असलेल्या ठिकाणचे बॅनर काढून टाकले. किरण ससाणे, सरपंच, वांबोरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *