Municipal Elections Campaign Alliance Sharad Ponkshe Hindu Vote Appeal | हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या: जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा, शरद पोंक्षेंनी दिला हिंदुत्वाचा नारा – Mumbai News



महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर. महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू असून मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केली आहे. या प्रच

.

हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले आहे. तसेच मत देताना सामाजिक हिताचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावरही जोरदार निशाणा साधला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे बोलत होते.

शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीतील निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, लोकशाही राज्यामध्ये आपल्या हिंदूंना दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे वाक्य मनात कोरून ठेवायचे आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. ते म्हणाले, तीन माणसांचे घर ज्याला चालवता येत नाही, त्यांनी 140 कोटींचा देश चालवणाऱ्याला शिकवू नये, असा घणाघात पोंक्षे यांनी केला.

पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, हलालच्या वस्तू वापरू नका. जाळीच्या टोपीवाल्यांकडून काहीही खरेदी करू नका. दोन्ही लढाई आपल्याला गुप्तपणे लढायच्या आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारात आपल्याला गुप्तपणे लढाई लढायची आहे. हिंदू राष्ट्र तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नेमकी कुठली लढाई जिंकायची आहे, ते मी तुम्हाला सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *